काही वेळा तुमचे सर्व विश्वास, तुमच्या सर्व आशा, तुमच्या मनातला आशेचा अंकूर करपवून टाकतात.... गेले ५० तास मुंबईपासून शब्दशः हजारो मैलो दूर आम्ही त्या वेळा वारंवार अनुभवतोय.थॅंक्सगिव्हिंगची सुट्टी मनाला निदान काही वेळ तरी उभारी देईल, रागाचे कढ आणि दुःखाचे उमाळे कमी करील अशी लंगडी, कमजोर, नपुंसक आशा करतोय. आणि कुस बदलावी तशी दर घडीला टीव्ही नाहीतर इंटरनेट नाहीतर भारतात फोन करून आता तरी संपलं असेल अशी भकास वाट पाहातोय.
टाहो फोडून सगळे मिडीयावाले बोंबलतायत, माझा देश हतबल, आजारी आणि कमजोर आहे. मान खाली घालून सहन करण्यापलिकडे मी काहीच करू शकत नाहीये.
रेप करतायत राकट, भिकारचोट, धर्माधुंद वेडसर मोजके माझ्या लाडक्या शहरावर आणि गुडघ्यात डोके घालून बसण्यापलिकडे मी काहीच करू शकत नाहीये.
आतंकवादाने पीडीत असलेल्या आपल्या देशाच्या इतिहासातलं सगळ्यात रक्तबंबाळ वर्ष आधीच बनलेलं असूनही, देशातल्या अनेक महत्वाच्या शहरात रक्ताचे चिखल बरबटलेले असूनही मुंबईसारख्या अगदी पहिल्या धारेच्या टारगेटबद्दल बेशरम बेपर्वाई बाळगणारे माझ्या देशाचे राजकारणी मुळमुळीत शब्दात निषेध करताना पाहण्यापलिकडे मी काही करू शकत नाहीये.
आपल्या अतिरेकीविरोधी गटाच्या प्रमुखाला सांगून दोन दिवसात बाहेरची २०-२५ वर्षाची पोरं उडवू शकतात, खुले आम सांगून. माझा देश सुरक्षित आणि कणखर असल्याच्या माझ्या विश्वासाच्या पार्ल्यातल्या त्या टॅक्सीसारखा चिंधड्या चिंधड्या उडतात.
यानंतरही माझ्या देशातले राजकारणी लांगूलचालनाचं राजकारण खेळत इथे जोपासलं जाणा-या ह्या विषाकडे दुर्लक्ष करणार असतील तर कुठला आशावाद बाळगायचा माझ्या देशाच्या विकासाबद्दल. ज्या देशाने जगाला शांतीचे संदेश आणि शिकवण दिली तो देश त्याच्या आजूबाजूच्या शेजा-यांसारखाच, जगाला जाळायला निघालेल्या राक्षसांचा पाळणा ठरणार का...
४८ तास झाले, हे माझं दुःस्वप्न असेल म्हणून अनेक वेळा जागा व्हायचा प्रयत्न करतोय, खोटा... वांझ. काही बदलत नाहीये. अजूनही ते एक दोघं माझ्या देशाची अख्खी सेना रोखून धरतायत.
कृपा करून सांगा की हे असं वाटणारा मी एकटाच आहे, वेड लागलंय मला.... यातून धडा घेऊन परिस्थिती कायमची चांगल्या दिशेकडे बदलण्यासाठी यापुढे वळेल असं वाटणारे लोक आहेत तिथे. देशाच्या कायदा सुव्यवस्थेला वळण लावू शकणा-या त्यांच्या टोळीत १००-२०० तरी असे लोक आहेत तिथे. निदान माझ्या वेडाला आवर घालावा म्हणून तरी सांगा मला हे असं आहे....
माझ्या अशाच एका वेड्या मित्राने अभिमानाने त्याच्या चॅट विंडोवर गेले १५ दिवस फडकवलं होतं एक वाक्य... "Moon concurred what next..."? नेक्स्ट् होतं ताज हॉटेल, ओबेरॉयची रक्तरंजीत लॉबी, नरीमन हाऊसचं चार मजली घर... Just that someone else concurred it आणि मी हताश होऊन फक्त पाहात होतो...
बिथरलोय, हादरलोय, हरलोय मित्रांनो... चारी मुंड्या चीत होऊन हरलोय. उघडावाघडा होऊन नासवलाय त्यांनी मला.... शरम वाटतेय... शरम.







And second how cruel destiny could be that the lady who made Obama who he is today and will probably go down in history as the greatest symbol of beyond-the-race culture, Obama’s dear grand mother, pure white by ethnicity passed away just one day prior to his election.